समाजाच्या निर्मितीचे कारण व्हावी कविता!

“शब्दमैफील”

आईच्या त्यागाचा सार व्हावी कविता।
बापाच्या घामाची धार व्हावी कविता।।
मैत्रीणीच्या नकाराचा सन्मान व्हावी कविता।
बायकोच्या पाठबळाचा मान व्हावी कविता।।
लोकशाहीच्या भविष्याची रक्षक व्हावी कविता।
धर्मांध विचाराची भक्षक व्हावी कविता।।                                               
लिंगभेदाचे सरण व्हावी कविता।
समाजाच्या निर्मितीचे कारण व्हावी कविता।।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर आणि युवा ग्रज्युएट फोरम द्वारा आयोजित कविसंमेलन आज दि.२१/०५/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उरुवेला कॉलोनी नागपूर येथे पार पडले या कार्यक्रमाला संमेलन अध्यक्ष आयु. प्रसेनजीत गायकवाड , कवी कथाकार साहित्यिक, संमेलन उदघाटक आयु. अविनाश पोईनकर, कवी सामाजिक कार्यकर्ते, भामरागड , आयु. प्रा. डॉ. मनोहर नाईक,कलोडे महाविद्यालय नागपूर तसेच बानाई नागपूर चे अध्यक्ष इंजि. अरविंद गेडाम , महा. राज्य बानाई चे उपाध्यक्ष इंजि. भास्कर खोब्रागडे उपस्थित होते या कार्यक्रमाला लाभलेले कवी संदीप शेंडे, नागपूर गौतम ढोके अमरावती, भुजंग बसवंते चंद्रपूर, सुनीता बहादे यवतमाळ, डॉ. वैशाली धनविजय नागपूर, संघमित्रा बाभरे नागपूर, सरिता सातारडे नागपूर, भूपेश नेतनराव चंद्रपूर, राजश्री ढबाले नागपूर इत्यादी कवी उपस्थित होते

 

https://youtu.be/0IK4oZQGqYE