बानाई नागपूर द्वारे १० वी १२ वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी फुललला बानाई – परिसर……..!

बानाई सभासद आणि विद्यार्थी पालक जुळले ॠणानुबंध…….!

कार्यक्रम-गुणवैशिष्ट्ये ::

सत्कार प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेले केळूसकर गुरुजी लिखित ” बुध्द चरित्र पुस्तक ” , त्या पुस्तक वाचनाने तथागत बुद्धांकडे बाबासाहेबांचे वळणे व समाज परिवर्तनाची उसळलेली लाट आणि आजच्या सत्कार प्रसंगी आकर्षक प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्हासह मिळणार्या त्याचं डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित ” बुद्ध आणि त्याचा धम्म ” ची जोडलेली सांगळ……! आणि विद्यार्थी मनाने घेतलेली उचल आणि त्यांच्या मनावर पडलेली अलगद छाप,…….हे समारंभाचे वैशिष्ट्य……!

गुणवंतांनी आपल्या गुणवत्तेला द्यावी, प्रज्ञा-शील-करुणेची, नितिमान समाजनिर्मिर्ती साठी संकल्पपूर्वक जोड ……..!

नागपूर अध्यक्ष- आयु. अरविंद गेडामजी, उपाध्यक्ष – आयु. अजय सावतकरजी, यांच्या चौफेर तुफानी वक्तृत्वीय फटकेबाजीने पेरला सत्कारार्थींमधे आश्वासक जोष……!

उपस्थित बानाई सदस्यांव्दारे, विचारमंचा वरील गणमान्याव्दारे, डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म ” सोबत सन्मानपत्र आणि सन्मानचिन्हाचे वितरण ठरले वैशिष्ट्यपूर्ण……..!

प्रमुख वक्ते : सर्वायु. डॉ सुरेश रांगणकर, सेंट विसेंट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालय व जयंत जांभूळकर सदस्य, शिक्षण मंडळ, यांनी सत्कारारार्थी समावेत साधला हृद्यसंवाद…….!

विद्यार्थी – पालकांचा भरघोस प्रतिसादाचे बोलके प्रतिक ठरले अतिरिक्त आसन व्यवस्थे करिता उडालेली तारांबळ…….!
बानाई नागपूर, आंतरतपासणीस आयु. निलेश नाखले सरांचे ओघवत्या – मधाळ वाणीतून केलेले संचलन ठरले कार्यक्रमाचे शिर्ष्यार्कषन …..!

12 वी विद्यार्थी सन्मान प्रसंगी १२वी गुणवत्ते सोबतच नीट मधील गौरवान्वित कामगिरी आणि आयआयटी प्रवेशकर्ते यांच्या नामोल्लेखावेळी कोसळला टाळ्यांचा धो – धो ढगफुटीजन्य धूंव्वाधार पाउस … ….टाळ्यांचा कडकडाटाने निनादला सभागृहात………!

दहा पाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकांची नियमित वाचन, उदबोधक ऑडिओ श्रवण, आणि आपल्या गुणवत्ता स्मरणार्थ निसर्ग ॠण फेडी करिता किमान दहा रोपट्यांच्या संवर्धनासह लागवडीचा निनादला… उदबोधक संदेश……!
सत्कार- सन्मानाने भारावले विद्यार्थी- पालक….. हा समारंभ कोरून गेला उपस्थितांच्या हृदय पटलावर. ……..!

कार्यक्रमाचे विडीओ पाहण्याकरिता खाली दिलेल्या लिंकला क्लिक करावे.

https://www.youtube.com/watch?v=q7Epd13QLsM

https://www.youtube.com/watch?v=n9x5wQKwz_Q

https://www.youtube.com/watch?v=CEJXNB7Myyo