बानाई नागपूर तर्फे कौशल्य विकास व उद्योजकता, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना कार्यक्रम

बानाई नागपूर तर्फे कौशल्य विकास व उद्योजकता, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना कार्यक्रम दि. ०५/०९/२०२१  नुकताच कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उरुवेला कॉलनी नागपूर येथे पार पडला त्यामध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूर व अमरावती  विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम टी. देवतळे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी त्या विभागातील आय. टी. आय. च्या प्रवेशासंबधी, योजनाविषयी, कौशल्यासंबधी सविस्तर माहिती दिली. सोबतच त्याच विभागाचे माजी संचालक सिध्दार्थ हस्ते यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टीने उपयुक्त अशी माहिती दिली. सामाजिक न्याय विभाग नागपूरचे उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड यांनी तेथील विविध योजनांवर सविस्तर प्रकाश टाकला. बानाई चे अध्यक्ष  इंजि. राहुल परुळकर उपस्थित होते. त्यानंतर प्रश्नोत्तरीचा तास फार रंगला. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन बानाई च्या कोषाध्यक्षा योगिता शंभरकर यांनी करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सूत्रसंचालन बानाई चे सचिव  डॉ. भुषण अंबादे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय इंजि. प्रवीण कांबळे यांनी दिला